हरवलेली पर्स व मोबाईल अवघ्या एक तासात महिलेला सुपूर्द

0
19

गोंदिया,दि.28ः ःशहरातील पोलीस स्टेशन रामनगर अंतर्गत येत असलेल्या कुंभारेनगर निवासी सुमित महेश बेदरे या धोटे बंधु विज्ञान महाविदयालयाच्या विद्यार्थ्याने त्यास रस्त्यावर मिळालेली लेडीज पर्स(ज्यात व्हीवो मोबाईल व रोख रक्कम) रामनगर पोलिसांच्या स्वाधिन करुन आपल्या प्रामाणिकतेचा परिचय दिला.त्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.विद्यार्थ्याकडून मिळालेल्या लेडीजपर्समधील मोबाईलच्या माध्यमातून पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा येथीलच मंदा अंबादे(वय 50) यांनी हरवलेल्या मोबाईलवर काॅल केला असता तो मोबाईल व पर्स पोलीस स्टेशनला मिळाली.त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून हरवलेली पर्स व मोबाईल अवघ्या एक तासाच्या आत परत मिळाल्याबद्दल पोलीसस्टेशनचे निरिक्षक संदेश केंजळे,पो.उपनिरिक्षक प्रियांका देसाई,पोहवा साठवणे यांचे आभार मानले.