गोरेगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रणजीत सरोजकर यांची निवड

0
7

गोरेगाव- तालुका पत्रकार संघ र न .777 ( भंडारा) गोरेगाव च्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीत वरिष्ठ पत्रकार रणजीत सरोजकर यांची एकमताने तालुका अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली.सदर बैठक वरिष्ठ पत्रकार संतोष नागनाथे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सर्वप्रथम संघटनेच्या दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. नंतर विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर सदर संघटनेच्या अध्यक्षपदाची नेमणूक करताना सर्वांनी रणजीत सरोजकर यांच्या नावाची घोषणा एकमताने करून अध्यक्षपदी निवड केली. सदर बैठकीत सचिव डीलेस्वर पंधराम,शालिकराम कोल्हे,खेमेंद्र कटरे,राजू एस मेश्राम,प्रमोद नागनाथे,नरेंद्र भट,आदेश फुले, मनोज सरोजकर,रणजीत सरोजकर इत्यादी पत्रकार बंधू उपस्थित होते. सभेचे संचालन सचिव डिलेश्वर पंंधराम यांनी केले आभार मनोज सरोजकर यांनी मानले.