आयुर्वेद भारतीय संस्कृतीचा भाग : खा.सुनिल मेंढे

0
15

मिरॅकिल ड्रिंक्स क्लिनीकचे उद्घाटन
गोंदिया : दैनंदिन जीवनात आपण कळतनळत दररोज आयुर्वेदिक औषधींचा उपयोग करीत आहोत. मोठमोठ्या आजारावर आयुर्वेदिक उपचार पध्दतीने प्रभाव दाखविला आहे. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये पुर्वजांनी दिलेली आयुर्वेदिक औषधांची शिकवण, महत्व अद्यापही कायम आहे. सरकार आयुष्य मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदिक उपचाराला प्रोत्साहन देत आहे. आज, गोंदिया शहरात मिरॅकिल ड्रिंक्स नावाने आयुर्वेदिक उपचारासाठी क्लिनीकचे शुभारंभ झाले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील नामवंत सेवानिवृत्त अधिकारी डॉ.एस.एम.राजु यांनी अखंड संशोधनातून नियो आयुर्वेदिक पध्दतीव्दारे अनेक असाध्य रोगांवर औषधांची निर्मिती केली आहे. या क्लिनीकच्या मााध्यमातून जिल्ह्यातील रूग्णांना लाभ घेता येणार आहे. मिरॅकिल ड्रिंक्स उत्पादनांचा उद्देश, संशोधन, उपचार पध्दतीचा निश्चितच रूग्णांसाठी लाभदायक ठरणार, असा आशावाद भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे यांनी केले.
गोंदिया येथील श्रीजी कॉम्पलेक्स येथे दक्षिण भारतातील नामांकित कंपनी मिरॅकिल ड्रिंक्स आयुर्वेदिक रूग्णालयाचे उद्घाटन २८ ऑगस्ट रोजी खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी डॉ.एस.एम.राजू, जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे, प्रसिध्द आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ.बी.के.चौधरी, भाजप शहर अध्यक्ष सुनिल केलनका, भाजपा जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात आयुर्वेदाचे जनक भगवान धनवंतरी यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत शुक्ला यांनी केले. त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच मिरॅकिल ड्रिंक्स आयुर्वेदिक रूग्णालयात मिळणार उपचार पध्दतीवर माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांनी क्लिनीकला शुभेच्छा देत आयुर्वेदिक उपचार आणि मिळणारे लाभ यावर मार्गदर्शन केले. भारतीय प्रशासकीय सेवेतील नामवंत सेवानिवृत्त अधिकारी डॉ.एस.एम.राजु यांनी रूग्णालय स्थापनेचा उद्देश, मिळणार्‍या सेवा, उपचार पध्दती, संतुलित आहार, असाध्य रोगांवर उपचार, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि सदृढ आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे संशोधित केलेल्या नियो आयुर्वेदिक पध्दतीने दीर्घ व जुन्या अशा १७० पेक्षा अधिक प्रकारच्या आजारावर प्रभावी उपचार सुविधा देण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाला डॉ.गायत्री सोनवाने, मदनलाल शुक्ला, गजेंद्र फुंडे, सचिन जाधव, हेमंत शुक्ला, डॉ.योगेश सोनवाने, विकास सार्वे, तुषार लिचडे, राजन चौबे, ऋषीकांत साहू, संजय मुरकूटे, भरत क्षत्रिय, शंभुशरणसिंह ठाकूर, सुरेश चंदनकर, मुन्नालाल यादव, श्रीराम मिश्रा, कमल अग्निहोत्री, भास्कर कडव, प्रविण पटले, सीए सुनिल चावला, विनोद चांदवानी, रमाशंकर शर्मा, योगेश्वर कावळे, डॉ.मितेश तुरकर, शिवपाल सोनपुरे, निशांत सोनपुरे, योगेश शुक्ला, पंकज त्रिपाठी, नईम खान, मंगेश पटले, वैâलाश चित्रीव, ललित शर्मा, व्यंकट पाथरू, शैलेष रंगारी, अरूण तुपकर, यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार सौ.अश्विनी शुक्ला यांनी मानले.
………………………..
मोफत आरोग्य तपासणीचा घेतला अनेकांनी लाभ
दीर्घ व जुन्या अशा आजाराच्या रूग्णांना उपचार मिळून आजाराचे निदान व्हावे, याकरीता रूग्णालयाचे शुभारंभ गोंदिया येथील श्रीजी कॉम्पलेक्स येथे करण्यात आले. यानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ शेकडो रूग्णांनी घेतला. शिबिरात डॉ.गायत्री सोनवाने (धाबेकर) यांनी रूग्णांचा उपचार करून औषधी विषयी माहिती दिली.