रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला; मंदिरात झेंडा लावायला गेलेल्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0
9

वर्धा : शहरालगत असलेल्या पिपरी मेघे गावात आज रक्षाबंधनाच्या दिवशीच शोककळा पसरली. मंदिरात झेंडा लावायला गेलेल्या गावातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अशोक सावरकर, बाळू शेर, सुरेश झिले अशी मृतांची नावे आहेत.गावातील तुळजा भवानी मंदिरात हे तिघे नेहमीप्रमाणे पाहणीसाठी गेले होते. मंदिरातील कळसावर झेंडा लावायला ते २५ फूट उंचीच्या खांबावर चढले. मात्र, त्यांचा तोल गेला. लागूनच असलेल्या ३३ केव्हीच्या विजेच्या तारांचा त्यांना स्पर्श झाला. विजेचा जबर धक्का बसल्याने ते मंदिराच्या शेडवर आदळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती सरपंच अजय गौळकर यांनी दिली.