नागपूर :- स्थानिक श्रीराम सभागृह राम नगर नागपूर येथे युवा भोयर , पवार मंच नागपूर तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.नामदेवराव राऊत अध्यक्ष अखिल भारतीय भोयर, पवार महासंघ, उदघाटक डॉ. जयश्री बारंगे, वैद्यकीय समिती, प्रमुख पाहुणे जियालाल शरणागत अध्यक्ष पश्चिम पोवार बहुउद्देशीय संस्था, मधुकर चोपडे, महामंत्री, अखिल भारतीय भोयर, पवार महासंघ उपस्थित होते, प्रमुख वक्ते विपीन मोक्कदम कृष्णा कन्सल्टन्सी, मनोज चव्हाण प्रोपेशनल ट्रेनर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम विदर्भ टॉपर कु. गरिमा मदनकुमार कडवे ९९ टक्के या विद्यार्थिनीचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. व कु. गरिमा ने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक यांना दिले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
४५ एस. एस. सी.विध्यार्थी,१० एच. एस. सी.विद्यार्थी,१० पदवीधर व इतर गुणवंतांचा या प्रसंगी मोमेन्टो देऊन सत्कार करण्यात आला.
कु. पायल गजानन चौधरी कारंजा या विद्यार्थिनीला रुपये ५ हजार शिष्यवृत्ती विलास डिग्रसे यांचे कडून प्रदान करण्यात आली.
कार्यक्रम मध्ये कास्ट सर्टिफिकेट,राज्य, केंद्र, परदेशीं शिष्यवृत्ती, विदेशातील शिक्षण व अडचणी, भविष्यातील शिक्षण प्रणाली, रोजगार संधी, पवार मिशन, आरोग्य आणि अन्य विषयावर विपीन मोक्कदम, मनोज चव्हाण, डॉ. जयश्री चौधरी, जियालाल शरणागत, सुरेश देशमुख, श्रावण फरकाडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी यांच्या विविध प्रश्नांना विपीन मोकदम यांनी उत्तरे दिलीत.
प्रस्तावना मुकुंद बन्नगरे यांनी केली .दिमाग की बत्ती जलावो प्रश्न मंजुषा सुवर्णा बन्नगरे,सपना चोपडे यांचे माध्यमातून घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश देशमुख यांनी केले तर आभार सीए गौरव धारपुरे यांनी मानले.
गुणगौरव करतांना, पाहुण्यांचे सत्कार समारंभ वेळी महिला समिती तर्फे मोमेन्टो, सर्टिफिकेट, श्याल, श्रीफळ, पुष्पगुछ ची मांडणी व वितरण अतिशय नियोजित पद्धतीने केले महिला समिती तर्फे संगीता गाखरे, भारती देशमुख, शालिनी देशमुख, मंदा फरकाडे, मृणाल घागरे, सपना चोपडे, रुपाली बोवाडे, अंजली फरकाडे व इतर महिला सदस्य यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले. कार्यक्रम यशस्वी करिताअजय फरकाडे, लालचंद चौधरी, निलेश फरकाडे, राजू चोपडे, प्रफुल घागरे, रमेश देवासे, सचिन बोवाडे, विठ्ठल चोपडे, जीवन देशमुख, जगनराव गाखरे, मनोज चव्हाण, सुरेश देशमुख, मुकुंद बन्नगरे, हरीश ढोबाळे विक्की बन्नगरे, तीर्थराज बोबडे, शंकरराव गद्रे,किशोर फरकाडे, यांनी विशेष सहकार्य केले.