अर्जुनी मोर. :–अर्जुनी मोर. येथील समता कॉलनी विस्वशांती बौद्ध विहार येथे भारतीय बौध्द महासभेची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.तालुका कार्यकारिणी निवड सभेच्या अध्यक्षस्थानी भारतिय बौध्द महासभेचे अध्यक्ष देवराव मेश्राम होते. यावेळी सोनदास गणवीर उपाध्यक्ष,,एम.एम.गजभीये सचीव, यांच्या प्रमुख उपस्थितीत,तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.तालुका कार्यकारिणी गठित करण्यासाठी,प्रकाश डोंगरे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.तालुका अध्यक्ष म्हणुन ओमप्रकाश वासनिक यांची निवड करण्यात आली.सचीव म्हणून नागेंद्र खोब्रागडे , यशवंत गणवीर सहसचिव, आर.के.जांभुळकर हे कोषाध्यक्ष ,अशोक मेश्राम उपाध्यक्ष, रमेश लांडे उपाध्यक्ष पर्यटन व प्रचार,सुभाष लांडे उपाध्यक्ष संरक्षण,हरीदास बांबोडे संरक्षण सचिव., मोरेश्वर धारगावे सचीव पर्यटन,व प्रचार मधुकर लांडगे संघटक,आर.एफ.मेश्राम संघटक,तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील, जेष्ठ व धम्म प्रिये उपासकांना तालुका कार्यकारिणीत सहभागी करुन घेण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन एम.एम.गजभीये यांनी केले.तर आभार प्रदर्शन,आयु नागेंद्र खोब्रागडे यांनी केले.