पोलीस बांधवांनो!बहिणींचे असेच रक्षण करत रहा!

0
11

अर्जुनी मोरगाव,दि.01-सणासुदीच्या काळात पोलिस बांधवांना क्वचितच सुट्टी मिळत असते.३० तारखेला रक्षाबंधनाचा सण बहिण भावाच्या प्रेमाची घट्ट वीण राखणारा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सशस्त्र पोलीस मदत केंद्र गोठणगाव व पोलीस स्टेशन केशोरी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
सर्वप्रथम पोलिस बांधवांचे औक्षण करुन राख्या बांधल्या.या उपक्रमामुळे त्यांचे मन‌ भारावुन गेले.पोलीसांचे जीवनात सुट्टी हा शब्द क्वचितच येत असतो.कारण त्यांचे बहुतांश दिवस बंदोबस्तात जातात.दसरा,दिवाळी,पोळा असो वा होळी यांचे हे सण बंदोबस्त करण्यातच जातात,परिवारासह सण साजरा करण्याची संधी त्यांना कदाचित मिळत असते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला.
या कार्यक्रमाला गोठणगाव सशस्त्र पोलीस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बाजड, पोलीस शिपाई भोवते,घोरमारे, केशोरी चे पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व कर्मचारी, रांकापा तालुकाध्यक्ष सुशिला हलमारे, युवती अध्यक्ष हर्षा राऊत,पं.स.सदस्या आम्रपाली डोंगरवार,संध्या शेंडे, वैशाली कोडापे,आशा ईश्वार,सकुंतला वालदे,भागरथा राणे तथा पदाधिकारी उपस्थित होते.