४ सप्टेंबरला मोहाडीत जनता दरबार

0
9

आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे ऐकतील जनतेच्या समस्या

मोहाडी : तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा घेऊन, प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता तहसील कार्यालय मोहाडी येथे ४ सप्टेंबर रोजी ११ वाजता आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांचे अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, नगरपंचायत, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, वनविभाग, पोलिस विभाग, पेंच/बावनथडी प्रकल्प, लघु पाटबंधारे विभाग व इतर शासकीय कार्यालयातील जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच मोहाडी तालुक्यातील विकास कामाचे नियोजन, शासकीय विभागातील योजनांचा आढावा घेऊन, जनसामान्यांचे प्रश्न निकाली काढण्याच्या उद्देशाने दिनांक ०४ सप्टेंबर २०२३ रोज सोमवारला सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, मोहाडी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले असून, शासकीय विभागाचे सर्व संबंधित अधिकारी जनता दरबारात उपस्थित राहणार आहेत.