ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण नको-ओबीसी संंघर्ष कृती समितीचे निवेदन

0
12

गोंदिया,दि.08- मराठ्यांचे ओबीसी करण करू नये, राज्य, सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसीवर अन्याय होईल अर्थात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोध नाही घटनादुरुस्ती करून त्यांना ओबीसी प्रवर्ग वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदियाच्यावतीने करण्यात आली आहे.ओबीसी  संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फेत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून ओबीसीमध्ये मराठयाच्या समावेशाला विरोध  करण्यात आलला आहे.निवेदेन देतेवेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,अमर वराडे,सोनु कुथे,कैलास भेलावे,एस.युु.वंजारी,तिर्थराज उके,जिल्हा परिषद सदस्य सौ.विमल कटरे,वंदना काळे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जि.प.सदस्य जितेंद्र कटरे, राजु काळे,राजीव ठकरेले,माधुरी भेलावे आदींं उपस्थित होते.