गावा-गावात कुटुंबभेट अभियान यशस्वी करा – विवेक जॉनसन

0
15

चंद्रपुर– स्वच्छ भारत मिशन ग्रामीन टप्पा- 2 अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभर शाश्वत स्वच्छतेसाठी गावे हागणदारी मुक्त अधिक मॉडेल केली जात आहेत . जी गावे मॉडेल झाली आहेत अशा गावांमधुन 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत दृष्यमान स्वच्छतेसाठी कुटुंबभेट अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले असुन ,गावागावात कुटुंब भेट अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

दिनांक 31 ऑगष्ट 2023 पर्यंत चंद्रपुर जिल्ह्यातील हागणदामुक्त अधिक मॉडेल झालेल्या गावांमधुन हे अभियान राबविण्यात येणार आहे. सदर कुटुंब भेटी करीता ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी ,ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, जलसुरक्षक, ग्रामरोजगार सेवक, सिआरसी, यांचा प्रती ग्रामपंचायत एक समुह तयार करण्यात येणार असुन, यांना समान कुटुंबाचे वाटप करुन भेटी देण्यात येणार आहे.गृहभेटी दरम्यान कुटुंबातील व्यक्तींना विचारायची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लॉस्टीक व्यवस्थापन , मैला गाळ व्यवस्थापन , पाणी व स्वच्छता आदी विषयावर प्रश्नांची विचारना करुन माहीती कुटुंबप्रमुखा कडुन जाणुन घेतल्या जाणार असुन, याबाबत कुटुंबला शाश्वत स्वच्छते विषयी जागृक करण्यात येणार आहे. चंद्रपुर जिल्ह्यात 141 गावे हागणदारी मुक्त अधिक मॉडेल झाले असुन, या गावातुन कुटुंब भेट अभियान राबविल्या जाणार आहे.