अनंत पौर्णिमा निमित्ताने काळीमाती येथे रविवारला सभेचे आयोजन

0
4
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोर. :-मोरगाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेली, स्मृतीशेष भदंत प्रज्ञा ज्योती थेरो यांच्या पावन पद स्पर्शाने पुनीत झालेली प्रसिद्ध धम्मभूमी, विहार काळीमाती येथे दरवर्षी अनंत पौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी दिनांक 10 /09 / 2023 रोज रविवारला दुपारी 12.30 वाजता भदंत आनंद व भदंत धम्मपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली आहे.या अनुषंगाने सर्व उपासक-उपासिका ग्राम स्तरावरील समाजाचे अध्यक्ष सचिव तथा समता सैनिक दलाचे शाखाप्रमुख, उपप्रमुख यांनी सभेला उपस्थित राहून कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.