स्व. ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवानीचे खो-खो मध्ये 14 वर्षीय मुले मध्ये वर्चस्व

0
1

गोरेगाव-स्व.ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवाणी खो-खो च्या खेळाडूंनी आपलं गोरेगाव तालुक्यात वर्चस्व प्रस्थापित केले. नुकत्याच तालुका गोरेगांव येथील क्रीडा संकुल हिरडामाली च्या मैदानावर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा गोंदिया घ्या वतीने आयोजित केलेल्या गोरेगांव तालुका खो-खो क्रीडा स्पर्धेत स्व. ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी चे १४वर्ष मुले संघ विजयी झाले.जिल्हा क्रीडा स्पर्धेकरिता पात्र झाले.त्या सर्व विजेत्यां संघाचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक के.के.यादव,मार्गदर्शक बी.टी.चौधरी यांचे विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एड.टी .बी.कटरे,सचिव यु. टी.बीसेन,मुख्याध्यापक आर. वाय. कटरे,शिक्षक ए .वाय . टेंभरे, एस. एल .बडोले,कु.ओ.बी .ठाकरे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.