ओबीसी आरक्षणात मराठ्याना आरक्षण देण्यास विरोध
नागपूर,दि.10ः- येथील संविधान चौकात सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीच्या वतीने मराठा समाजाला कुणबी ओबीसी समाजाचे आरक्षण देण्याच्या भुमिकेला विरोध करण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला. आज संविधान चौकात आंदोलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितिचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाने पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेचे गुणेश्वर आरिकर,राजेश काकडे, रमेश चोपडे, जानराव केदार, प्रल्हाद पडोळे,प्रा अवंतिका लेकुरवाळे,बाबा तुमसरे सुरेश गुडधे पाटील, राजेंद्र कोरडे,सुरेश वर्षे, राजेश काकडे,राज तिजारे,बाळा शिंगणे, मिलिंद राऊत, राजेश चुटे,सुरेश कोंगे, सुषमा भड , अरुण वराडे, डॉ राजेश ठाकरे,विवेक देशमुख सहभागी झाले होते.आंदोलनाच्या प्रास्तविकेत अवंतिका लेकुरवाळे यांनी ओबीसी समाजामध्ये आरक्षण मागण्याचा संवैधानिक अधिकार मराठा समाजाला नाही.तरी सुध्दा सरकार मराठ्यांची दिशाभूल करीत आहे.यासाठी दीर्घ कालीन आंदोलन समाजाला करावे लागणार आहे.आज पहिल्या दिवशी या आंदोलनाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितिन राऊत,माजी आमदार डॉ आशिष देशमुख, सुधाकरराव कोहळे,दिनानाथ पडोळे,माजी राज्यमंंत्री डाॅ.परिणय फुके,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधींनी या आंदोलन मंडपाला भेट दिली.
ओबीसी समाज मराठ्यांच्या घुसखोरीवर चिडलेला असून सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर ओबीसी समाजाचा आक्रमक भूमिकेत येईल असा सुर आंदोलनातून निघाला.आंदोलनाला संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने सुभाष घाटे, मुस्लिम समाजाचे शकील पटेलव कास्ट्राईब संघटनेचे अरुण गाडे यांनी सुध्दा पाठिंबा जाहीर केला.आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक युवक, महिला, तसेच विविध ओबीसी जातीमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.