प्रतापगड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

0
10

अर्जुनी मोर.दि.१०- तालुक्यातील तिर्थक्षेत्र प्रतापगड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते, पंचायत समिती सदस्य आम्रपाली डोंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रतापगड हे गोंदिया जिल्ह्यातील हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे.आज तिर्थक्षेत्र विकास निधी व प्रादेशिक पर्यटन विकास निधी अंतर्गत शिवमंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे.भक्तनिवास परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे.हिली पायरी परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे.विश्रामगृह परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करणे या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी इंजि.यशवंत गणविर म्हणाले की प्रतापगड हे हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले तिर्थक्षेत्र,या तिर्थक्षेत्राला वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येतात.त्यांना कोणत्याही प्रकारची उणीव या तिर्थक्षेत्र स्थळी भासु नये म्हणून येथील विकास व सोयी सुविधा यांना महत्त्व देऊन विकास कामांसाठी सर्व स्तरातून निधी खेचुन आणुन विकासाला गती देऊ व सर्वांच्या सहकार्याने या तिर्थक्षेत्राला वेगळी ओळख निर्माण करु.
या भुमिपुजन सोहळ्याला सरपंच भोजराम लोगडे, पोलिस पाटील योगेश जनबंधु, ग्रामपंचायत सदस्य सुखदेव कनोजे, हर्षा राऊत,नलु हुर्रा,रेवता गहाणे,छाया डोंगरवार,गिता बावणे,ग्रामसेवक डी.जी.दरवडे,सलीम पठाण,अशोक गायकवाड,मधुकर पुस्तोडे तथा ग्रामस्थ उपस्थित होते.