मातंग समाजाची गोंदिया जिल्हाकार्यकारणी गठीत

0
8

तिरोडा- गोंदिया जिल्हा मातंग समाजाच्या बैठकीचे आयोजन तिरोडा येथील सुरभि होटल येथे सुरेश भाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली होती. यावेळी मातंग समाजाची जिल्हा कार्यकारणी सर्वानुमत्ते गठीत करण्यात आली.
गोंदिया जिल्हा मातंग समाज जिल्हा अध्यक्षपदी राजेशकुमार तायवाडे, उपाध्यक्ष अजय बावने, सचिव सुरेश भाले, कोषाध्यक्ष देवानंद ढोके, सह सचिव राजेंद्र भाले, संघटक कपिल बावने, सदस्य भोजराज बावने, मारोती डोंगरे, अनवर खडसे, राजहंस शिंदे, राधेश्याम इंगळे व कबिरचंद कुचेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जगदीश ( बालु ) बावनथड़े, आरिफ़ पठान, नितेश डुंडे, लुकेश डुंडे, यशवंत बावने व मातंग समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.