जागतीक परिचारिका दिन उत्साहात

0
25

गोंदिया : शासकीय नर्सिग कॉलेज व बाईगंगाबाई स्टाफ नर्सेस यांच्या संयुक्तवतीने गुरूवारी जागतीक परिचारिका दिन (फ्लोरेन्स नाईटींगल डे) उत्साहात साजरा करण्यात आला.
उद््घाटन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवी धकाते यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाईटिंगल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुवर्णा हुबेकर, केटीएसच्या मेट्रन सुखदेवे, गंगाबाईच्या मेट्रन अरूणा मेश्राम, नर्सिग कॉलेजच्या प्राचार्य रामटेके, जोसेफ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. धकाते यांनी, कठीण परिस्थितीत आरोग्य सेवा देताना फ्लोरेन्स नाईटींगेल यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन केले. डॉ. हुबेकर यांनी फ्लोरेन्स नाईटींगेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच विदर्भातील नामांकित मातृसेवा संघाच्या कमलाबाई हास्पेट म्हणजे भारतीय नाईटींगेल आहेत. त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.यानंतर केटीएसचे मेट्रन सुखदेवे यांनी निरंतर नवनवीन उपचार कौशल्य आत्मसात करूण रुग्णांना संजीवनी देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात सर्व प्रशिक्षणार्थिंना मेणबत्ती प्रज्वलीत करून परिचर्या सेवेची शपथ देण्यात आली. निष्ठा, सर्मपण, रुग्णांची माहिती व उपचारांच्या गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धकाते यांच्या हस्ते जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित क्रिडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, संगीत स्पर्धा आदीमध्ये विजयी झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना बक्षीसे वाटप करण्यात आले. संचालन करून आभार करूणा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला नर्सिग कॉलेजच्या सर्व प्राध्यापीका, गंगाबाईच्या सर्व पीएचएन, स्टॉफ नर्सेस व प्रशिक्षणार्थी परिचारिका उपस्थित होत्या.