जमिनीचा वाढीव मोबदला द्या

0
16

तिरोडा -कलपाथरी प्रकल्पात जमीन गेलेल्या २६ शेतकर्‍यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा यासाठी माजी आमदार दिलीप बंसोड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांना निवेदन देण्यात आले. प्रकल्पात २६ शेतकर्‍यांची ३0.७६ हेक्टर जमीन गेली आहे. यात काही आदिवासी असून आदिवासींच्या निर्णयानुसार त्यांना जमीन देणे गरजेचे आहे. मात्र शेतकर्‍यांच्या जमिनी गावठान मध्ये येत असल्याने त्यांना मोबदला देत येत नसल्याने महिरे यांनी सांगितले. यावर मात्र बंसोड यांनी तुम्ही प्रकरण आयुक्तांकडे पाठवा आम्ही उच्चस्तरावरून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगीतले. निवेदन देताना पंचम बिसेन. जिल्हा परिषद सदस्य ललीता चौरागडे, रूस्तम येळे, केवल बघेले, फरदे व अन्य उपस्थित होते.