अमरावती ता ११– सोमवारी ता.११ येथे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी तर्फे दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रम आटोपून आमदार रवी राणा व कार्यकर्ते अमरावती जाण्यासाठी निघाले असता नवीन बस स्थानक परिसरातील अग्रसेन चौकात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख महेंद्र दिपटे यांच्याशी त्यांचा वाद झाला त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आमदार रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यानी महेंद्र दिपटे यांना जबर मारहाण केल्याची दिपटे यांनी सांगून आमदार रवी राणा यांच्या कानशिलात हानल्याचेही दिपटे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी अपशब्द वापरल्यावरून सदर वाद झाल्याचे समजते सदर घटना सोमवारी ता ११ सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान नवीन बस स्थानक परिसरात अचानक घडल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र दिपटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस स्टेशन समोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी जमा होऊन आरोप प्रत्यारोप सुरू होता. विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा त्या परिसरात पोलीस उपस्थित नव्हते वृत्त लीहोसतोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.
***********