नगर रचना अधिकाऱ्यास लाच घेतांना पकडले

0
10

अमरावती, दि. ११ : अमरावती महापालिकेतील सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यास आज सोमवारी अटक करण्यात आली. परमेश्वर पांडुरंग गाडगीळ (३१ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणातील तक्रारदार सिव्हिल इंजिनिअर असून त्यांच्या ग्राहकाच्या शेताचे वाणिज्य प्रयोजनार्थ अकृषकचे ऑनलाइन प्रकरण पुढे पाठवण्याकरिता परमेश्वर गाडगीळ यांनी २० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ७ हजार ५०० रूपये देण्याचे ठरले होते. परंतु आज कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी गाडगीळ यांना साडेसात हजार रूपयाची लाच घेतांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक मारुती जगताप, अप्पर अधिक्षक देवीदास घेवारे, उप अधिक्षक शिवलाल भगत, मिलींदकुमार बाहकर, निरीक्षक सतिश उमरे, पोलीस अंमलदार प्रमोद रायपूरे, विनोद धुळे, राहुल वंजारी, आशिष जांभोळे, शैलेश कडु यांनी केली.