सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्य पुरस्कार अमरावतीच्या प्रमोद महादेव पुरी यांना जाहीर

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अमरावती, दि. 14 :  राज्य शासन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करीत असते. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान होतो तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही त्याव्दारे प्रेरणा मिळत असते.

सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे सन 2021-22 ची राज्य पुरस्कार प्राप्त अधिकारी/कर्मचाऱ्यांची यादी शासन निर्णयाव्दारे नुकतीच जाहीर केली. त्यात मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक अमरावती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रमोद महादेव पुरी यांचा समावेश आहे.

प्रमोद पुरी हे नम्रता, वक्तशीरपणा व कार्यालयीन कामकाजामुळे महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. राज्यात २०१६ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला, ह्याची अधिसूचना २०१९ ला निर्गमित झाली. आणि ह्याच वेळेला २०१९ पासून खऱ्या अर्थाने प्रमोद पुरी यांच्या कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. प्रमोद पुरी यांनी सातवा वेतन आयोगाचे फिक्ससेशन, विकल्प आणि थकबाकी याबाबत सविस्तर मार्गदर्शन संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाले आहे. प्रमोद पुरी हे अमरावतीला मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून आज राज्यातील हजारो नवतरुण अधिकारी आणि लिपिक यांना प्रशासकीय बाबींचे धडे देत आहेत.

सातवा वेतन आयोगाचे मार्गदर्शन करण्यासाठी यशदा पुणे ह्या संस्थेने त्यांची राज्य मार्गदर्शक म्हणून निवड केली होती. प्रशासकीय कामात गती प्राप्त होण्यासाठी कर्मचारी ऑनलाईन कामात साक्षर असणे गरजेचे आहे. प्रमोद पुरी स्वतः ऑनलाईन कामात अत्यंत कुशल असून राज्यातील हजारो नवतरुण कर्मचाऱ्यांना स्वतःच्या Pramod Puri या Youtube चॅनेल व www.pramodpuri.com ह्या website च्या माध्यमातून प्रशासकीय कामाचे ज्ञान देण्याचे काम ते करत आहेत.

सामाजिक व व्यावसायिक बांधिलकी जपणारे प्रमोद पुरी यांना सन २०२१-२२ चा राज्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व समन्यातून त्यांचे कौतुक होत आहे तर पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याने शासनाचे आभार सर्व सामन्यातून मानले जात आहे.

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी ” अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधुन अभियंता गौरव समारंभ 2023 हा षण्मुखानंद सभागृह, माटुंगा, मुंबई येथे साजरा होत आहे. त्या समारंभात श्री पुरी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.