भर पावसात निघाली गोंदियात मारबद

0
13

गोंदिया: जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी बैलपोळा एन भरात असताना सुरू झालेला पाऊस रात्र भर बरसला आणि शुक्रवारी पहाटे पासून तर चक्क मुसळधार पावसाला सुरुवात झाली.सकाळी ११ वाजता पर्यंत सातत्याने पाऊस सुरूच राहिला. आज बरसलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणाहून निघणाऱ्या मारबत आणि बडग्यांची मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण पडले. काही अती उत्साही तरुणांनी पाऊस ओसरत नसल्याचे पाहून मारबत लाच रेनकोट घालून मिरवणूक काढली. स्वत: हातात छत्री घेऊन काही ठिकाणी औपचारिक मिरवणूक काढण्यात आली. पण त्यात उत्साह दिसून आला नाही.गोंदियातील रस्त्यांचे खड्डेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी खड्डे घेऊन जा गे मारबतचा संदेश दिला.