कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा जी.आर. रद्द करा:- मिथुन मेश्राम

0
16

= उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर
अर्जुनी मोर. :–देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे, सरकारने ही कंत्राटी नोकर भरती तात्काळ थांबवावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया चे कार्यकर्ता मिथुन मेश्राम यांनी दाले. त्याच प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देतांनी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून १०% आरक्षण मर्यादा वाढवून अल्पसंख्याक यांना आरक्षण दिले. त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावा.
दिनांक 18 सप्टेंबर 2023ला शरदचंद्र पवार,जयंत पाटील,अनिल देशमुख,रोहितदादा पवार,मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते सलीलदादा देशमुख,बजरंसिंह परिहार,सौरभ मिश्रा यांच्या निर्देशानुसार मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या कार्यालया समोर कंत्राटी पदभरतीचा जी.आर जाळून होळी करण्यात आली. व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी मिथुन मेश्राम, राहुल भोयर, सुरेश खोब्रागडे, विवेक बोरकर, बाबुलाल नेवारे, महेश बोरकर, भुपेंद्र कोरे, जयेश मेश्राम, अभिषेक रामटेके, रोहित ढवळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.