39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ शेतकरी पती – पत्नी जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

शेतकरी पती – पत्नी जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

0
25

blank

सडक अर्जुनी.दि.20-तालुक्याच्या ग्राम घाटबोरी / कोहळी येथील शेतात तुटलेल्या जीवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला.तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी ११
वाजता घडली. तुळशीदास रेवाराम लंजे (४५) व माया तुळशीदास लंजे (४२) दोन्ही रा.घाटबोरी/कोहळी अशी दाम्पत्यांची नावे आहेत. तर इंदु हिरालाल लंजे (४३) ह्या गंभीर जखमी आहेत.
सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोदामेडी ते सिंदीपार मार्गावरील आपल्या शेतात धानाचे निंदण करण्यासाठी लंजे कुटुंबातील दोन भावंडे २० सप्टेंबर रोजी सकाळी शेतात गेले असतांना शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने या दाम्पत्याचा मृत्यू झाला. या घटनास्थळावर हिरालाल लंजेही उपस्थित होते.ते करंटमुळे ते खाली पडले असल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी विद्युत तारेला लाकडी काठीने लांब फेकले, त्यामुळे इंदु हिरालाल लंजे यांचे प्राण वाचविले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथे हलविण्यात आले आहे. 

प्राप्त माहिती नुसार शेतकरी लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाचे 33 एल. टी. ची लाईन गेली आहे. पाऊस व वाऱ्याने सदर लाईन चे तार 5 ते 6 दिवसापासून तुटून पडले होते. याची माहिती काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे काही शेतकरी सांगतात. तर ही बाब सदर शेतकऱ्याला माहीत नव्हती त्यामुळे चालू विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना आज दीं. 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता शिंदिपार ते कोदामेडी मार्गावरील शेत शिवारात घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शेतकरी व गावकरी घटनास्थळी उपस्थित झाले. दरम्यान घटनास्थळी पोलिस विभागाचे व विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा तय्यार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्युत विभागाने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

blank