गोंदिया जिल्हा व्यापारी संघाच्या उपाध्यक्षपदी सुनील अग्रवाल

0
3

देवरी, दि.२०- देवरी येथील दिल्ली हॉटेलच्या सभागृहात गोंदिया जिल्हा व्यापारी संघाची सभा नुकतीच पार पडली. यासभेत देवरीचे सुनील अग्रवाल यांची जिल्हा व्यापारी संघाच्या उपाध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली

या सभेच्या अध्यक्षस्थानी गोंदिया व्यापारी संघाचे संजय जैन हे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लक्ष्मण लद्दानी, संदीप सोनी, संपत अग्रवाल, अॅड. प्रशांत संगीडवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावोळी बोलताना मान्यवर वक्त्यांनी केंद्र सरकारच्या जीएसटी संकलन कायद्याप्रती नाराजी दर्शविली. देशाच्या अर्थव्यवस्था व्यापाऱ्यांच्या भरवशावर टिकून आहेत, यामुळे जीएसटी कायद्यात व्यापाऱ्यांसाठी सरकारने लवचिकता दाखविली पाहिजे, अशी मागणी यावेळी व्यापारी संघाकडून करण्यात आली.

या सभेच देवरी येथील प्रतिष्ठित व्यापारी सुनील अग्रवाल यांची गोंदिया जिल्हा व्यापारी संघाच्या उपाध्यक्षपदी सर्वनसंमतीने निवड करण्यात आली. याशिवाय  देवरी तालुका व्यापारी संघाचे समन्वयक म्हणून त्यांचेवर दुहेरी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

सभेचे संचलन सुजीत अग्रवाल यांनी केले. यावेळी जीत्ते भाटीया, राकेश बगडीया, सोनू अग्रवाल, अप्पू अग्रवाल, सीमरन भाटीया, रामअवताप अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, चेतन अग्रवाल आणि आकाश अग्रवाल यांची उपस्थिती होती.