अर्जुनी मोर. :- तालुक्यातील बोरटोला (सावरटोला) येथील नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण सोहळा व अंगणवाडी पोषण आहार या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व उदघाटन सभापती महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद गोंदिया यांच्या शुभहस्ते सविताताई कोडापे सभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव यांच्या अध्यक्षतेखाली लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य गोंदिया,.होमराज पुस्तोडे उपसभापती पं.सं.,संदिप कापगते पंचायत समिती सदस्य,सौ.कुंदा लोगडे पंचायत समिती सदस्या,सौ.पुस्पलता द्रुगकर पंचायत समिती सदस्या सौ.कुरुंदा वैघे सरपंच बोरटोला,काशिनाथ कापसे उपसरपंच बोरटोला,किरणापुरे मॅडम, पुस्तोडे मॅडम, डॉ.स्वेता कुलकर्णी, मोरेश्वर मेश्राम व इतर सर्व मान्यवर मंडळीचे उपस्थित संपन्न झाले. यात चान्ना बिट अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस बोरटोला येथील महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.