गोंदिया- महाराष्ट्र नाभीक महामंडळ गोंदिया शाखेच्यावतीने ओबीसीमध्ये मराठा समावेश करण्यास विरोध करीत करुन ओबीसींंची जातनिहाय जनगणना करण्यासोबतच वसतीगृह तात्काळ सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्र्यांना आज दि.22 पाठविण्यात आले आहे.
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देवून त्यांचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी जोर धरत असताना आता कुणबी समाजाने तर याला विरोध दर्शवला आहे.आत्ता ओबीसीमधील इतर समाजही विरोध करु लागला असून निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आपली भूमिका स्पष्ट करीत आहे.त्या अनुषगांनेच नाभिक महामंडळाने राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यास अजिबात विरोध नाही. फक्त हे आरक्षण इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातून देऊ नये. असे केल्यास या प्रवर्गातील ३७० दुर्बल घटकांतील जातींवर अन्याय होईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.सोबतच केंंद्रसरकारने ओबीसीसंह सर्वच जातींची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी गोंदिया जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष बेनिराम फुलबांधे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कैलास भेलावे,नाभिक महामंडळ गोंंदियाचे कोषाध्यक्ष कृष्णगोपाल लांजेवार,राजेश जांगडे,दिनेश हुकरे,रोशन बडोले,शालीकराम उरकुडे,चंदु बहेकार,रामु वरखडे,कृपाल लांजेवार,मुनेश्वर कापगते,पुष्पा खोटेले,किरण हटवार,किशोर शेंडे,राजु शिवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.