गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीमध्ये ओबीसी आरक्षणाला घेवून उद्भवलेली स्थिती तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय तसेच समाजातील प्रलंबित समस्या या मुख्य मागण्यांना घेवून ओबीसी संघटनांच्या वतीने आज १८ सप्टेंबर रोजी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 सप्टेबंरपासून साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली असून या साखळी उपोषण आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.गोंदिया जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीमध्ये ओबीसींना एकही जागा देण्यात न आल्याने जिल्ह्यातील ओबीसीमध्ये आक्रोश दिसून येत आहे.जन आक्रोश मोर्च्याच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्यावतीनेे उपजिल्हाधिकारी चंंद्रभान खंडाईत यांनी पोलीस पाटील भरतीवर जिल्हाधिकारी यांच्या वतीने स्थगिती असल्याचे सांगितले.तसेच दोन तीन दिवसात शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र जिल्हा प्रशासनाच्यावतीने जन आक्रोश मोर्च्यात देण्यात आलेले आश्वासनाची पुर्तता न करता वेेळकाढू धोरण राबविले जात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेले साखळी उपोषण अधिक त्रीव करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.आंदोलनात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, ओबीसी अधिकार मंच , ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ,राष्ट्रीय ओबीसी महासंघ, महात्मा फुले समता परिषद, ओबीसी अधिकार मंच, युवा ग्रॅज्युएट फोरम, संविधान मैत्री संघ, अवामे मुस्लिम समाज गोंदिया तसेच आदिवासी,युवा बहुजन मंच, एसबीसी, एनटी संघटनांनी,आदिवासी संंघटनासह ओबीसीतील सर्व जात संघटनाचे पदाधिकारी सहभागी होत आहेत.
गोंदियात ओबीसी संघटनेच्या साखळी उपोषण आंदोलनाचा तिसरा दिवस
वाढदिवसाच्या शुभेच्छा