नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. मोर भवन परिसरात पाणीच पाणी जमा झाले. बस स्थानकावरील बस पाण्यात बुडाल्या. एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 40० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तर पावसामुळे एक महिला मृत्य झाला आहे. मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या बोलावल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अपडेट्स –
- नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
- एसडीआरएफच्या 2 तुकड्या 7 गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.
- एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.
- मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
- नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत.
- अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे.
- अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत.
- शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
- कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
- वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
-
आपत्कालीन सेवेसाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.शुक्रवारी रात्री नागपुरात अवघ्या चार तासात 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे.शहरातील बर्डी, रामदासपेठ रोड, शंकर नगर चौक रस्ता, तसेच नरेंद्र नगर, मनीष नगर भूयारी पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकीचा पूर्ण खोळंबा झाला.अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने हे पाणी बाहेर काढताना नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे.पावसामुळे वाहने पाण्याखाली गेल्याने अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.शहरातील मोरभवन बसस्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.बसस्थानकातील बस पाण्यात पूर्ण बुडाल्याचे दिसत आहे.नागपुरातील रस्त्यांना अक्षरश: नदी, ओढ्यांचे रुप प्राप्त झाले होते.अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचल्या आहेत.
-
वाहने पाण्यात
शहरातील खोलगट भागात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. शहरात यापूर्वी २७ जुलै रोजी २४ तासात विमानतळावर १६४ मिमी, पारडी येथे १७९.८ मिमी, बर्डी भागात १७७.४ मिमी असा एकूण ५२१.२ मिमी विक्रमी पाऊस झाला होता. साधारणत: सरासरी १७३.७ मिमी पाऊस होतो. प्रादेशिक हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला असताना प्रत्यक्षात रेड अलर्टसारखा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. लोकांना अक्षरक्ष: पाण्यातून वाहने काढावी लागली.