पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत: आमदार कृष्णा गजबे

0
5

ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे आयुष्यमान भव: कार्यक्रम संपन्न

आमदार कृष्णा गजबे यांच्या शुभ हस्ते हस्ते आयुष्यमान कार्ड चे वाटप

गडचिरोली:आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Yojana) राबविली जात आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. केंद्राने 2018 पासून या योजनेला सुरूवात झाली. कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. ‘आयुष्मान भारत योजना’ ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी वडसा येथे आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत आयुष्यमान भव: शिबिर येथे मार्गदर्शन करतांना केले.
यावेळी मोतीलाल कुकरेजा भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, शालूताई दंडवते माजी नगराध्यक्ष, डॉ प्रांजलताई वानरे उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धुर्वेजी, डॉ. प्रमोद खेडाणे, साळवेजी , डॉ अविनाश मीसार डॉ. ठाकरेजी, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रमोद झील्पे, सह लाभार्थी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.