ककोडी चिल्हाटी मुख्य मार्गावरील पुलावर खड्डे देतायेत अपघातास निमंत्रण

0
10

विनोद सुरसावंत/ ककोडी- देवरी तालुक्याच्या पूर्वेस महा-छत्तीसगड सीमेवरील ककोडी गाव विकासाचा नावाने किंवा राजकीय पुढा-यांचा उदासिनतेचा नावाखाली कोसो दुर आहे असे म्हणण्यात शंका नाही.त्याचे उदाहरण ककोडी- चिल्हाटी मुख्य मार्गावरील नाक्यावरील पुल. हा पुल पुर्णपणे आतुन पोकर झाला असुन खस्ताहाल झाला आहे. पुल आतुन पोकर झाल्याने पुलावर मोठमोठे जीवघेणे गठे पडले आहे. ह्या खठ्यामुळे मोठे अपघात होउन जिवहाणी होण्याची शक्यता टाळता येत नाही.
महा-छत्तीसगड ला जोडणारा हा मुख्य आंतरराज्य मार्ग असुन लहान वाहतुकी ते मोठमोठे जळवाहन ह्या मार्गावर चालतात. एखादे वाहन ह्या पुलावर पडलेल्या खठ्यात धसले किंवा पलटले तर मोठी जिवहाणी होण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच हा मार्ग पुर्णपणे बंद पडेल. ककोडी गावाचा अन्य क्षेत्रासी संपर्क तुटेल यांचा सरळ गावात येणारे आणि बाहेर गावी शिक्षणाला जाणार्‍या विद्यार्थी वर्ग, वैद्यकिय सेवेवर होइल.अनेक प्रकारे नागरिकांना शारिरीक, आर्थिक आणि मानसिक त्रास शहन करावे लागेल.ह्या पुलाचा दुरूस्ती आणि उंची वाठविण्या करिता संबधित विभाग आणि क्षेत्रातील निवडून दिलेले राजकिय पुढारी यांना संग्याणात आणुन दिला होता. दुरुस्ती चा नावाखाली फक्त काम चालावु काम करण्यात आला होता.अशा भेसळ कामामुळे एखादे अपघात झाल्यास आणि मार्ग बंद होऊन गावाचा अन्य क्षेत्राशी संपर्क तुटल्यास याची जवाबदारी कुणाची राहील हा प्रश्न निर्माण झाला आहे.