दुसरे शाक्त शिवराज्याभिषेक व सत्यशोधक समाज स्थापना दिवस साजरा

0
10

गोरेगांव: छत्रपती शिवाजी महाराजानी 6 जून 1674ला वैदिक वर्णधर्माने केलेला शिवराज्यभिषेका प्रसंगी झालेल्या अपमानमुळे राष्ट्रमाता जिजाऊचा 17 जूनला मृत्यू होतो.या वर्णधर्माच्या झालेल्या छळामुळे जिजाऊंचा मृत्यू होतो म्हणून बौद्ध धर्माच्या शाक्त पंथानुसार 24 सप्टेंबरला दुसरा राज्याभिषेक करतात.सत्य शोधने म्हणजे स्वतः च्या जीवनातील गुलामी दूर करणे होय, निर्गुण निराकार निर्मीक व भक्तांच्या मधला मध्यस्त नकारण्या, निर्मीकाच्या समोर कुणी उच्च नीच नाही तर सर्व लेकरे समान आहेत हे सांगण्यासाठी महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर1873 सत्यशोधक समाजाची स्थापना करतात.
वैदीक धर्म झुगारणारे संत महापुरुषच समाजसुधारणा व वैचारिक क्रांती करू शकले.याची पदोपदी इतिहास साक्ष देते आहे.छत्रपतींच्या रयतेच्या स्वराज्याचा व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा विरोध करणारी मनुवादी धर्मांध प्रवृत्ती आज पण संविधान व obc SC St यांच्या हक्क अधिकाराचा विरोध करतेय त्यापासून सावधान राहून महापुरुषांचा वैचारिक संघर्ष -ओबीसी आंदोलन गतिमान करण्यासाठी आव्हान करण्यात आले.गोंदिया ओबीसी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामभगत पाचे,महासचिव नरेंद्र बांते कोषाध्यक्ष टेकचंद चौधरी यांची निवड करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.ग्राम सभांचे आयोजनातून ग्रामशाखा गठित करण्याचे ठरविण्यात आले.प्रबोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बी. एम.करामकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, गोंदिया यांनी भूषविले असून राज्यसंघटन सचिव सावन कटरे,संजय लोखंडे, विनायक येडेवार,भूमेश ठाकरे, यांनी संबोधित केले असून कार्यक्रमाचे संचालन आर आर अगडे व आभार भुमेश शेंडे यांनी मानले.