पुजारीटोला-कालिसराड धरणावर सुरक्षा रक्षकच नाही ?

0
8

करोडो रुपयांचा काय…?
बोरगाव/देवरी-गोंदिया जिल्ह्यांत पाऊसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने धरणावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुजारीटोला-कालिसराड पाणी साठ्यात भरमसाठ वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र धरणांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
जिल्ह्याची तहान भागवणारे पुजारीटोला -कालिसराड धरण सध्या संकटात सापडले आहे. धरण परिसरात मद्यपींचा मुक्तसंचार, दिवसाढवळ्या रंगणाऱ्या पार्ट्या, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या धरणांची देखरेख करण्यासाठी सुरक्षा रक्षकच नसल्याने हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड परिसरातील नागरिक करू लागले आहेत. धरणातील पाणीसाठ्याद्वारे विषबाधेचे प्रकार सहज घडू शकतात. यासह धरण परिसरात स्वच्छता राखणे गरजेचे आहे. असे असताना गोंदिया पाटबंधारे विभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
धरणाला रविवारी (ता.२४) भेट दिली, तेव्हा विदारक चित्र बघून धक्का बसला. या धरणातील पाण्यावर हजारो लोक आपली तहान भागवतात. या धरणावर कोणीही सुरक्षारक्षक अगर कर्मचारी नाही. सर्व ऑपरेटिंग गेटचे रूम सताड उघडे असतात. यामुळे येथे येण्यावर कोणावरही निर्बंध राहिलेले नाही. धरण परिसरात लावलेले दिवेसुद्धा चोरून नेले आहेत. तर काही नादुरुस्त पडलेले आहेत. धरणावर मद्यपींच्या पार्ट्या रंगल्याचे निदर्शनास आले आहे. तेथे दारूच्या रिकाम्या बाटल्या ही बाब अतिशय गंभीर आहे. अशा परिस्थितीत कोणीही येऊन धरणाचे विध्वंस अगर विषबाधा सहजरीत्या करू शकतात. याबाबत योग्य ती दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे, पाहवयास मिळाले आहे.
शेतकऱ्यांना जीवनदान ठरणारे पुजारीटोला -कालिसराड धरण पाटबंधारे विभाग यासाठी लाखों रुपये पाणीपट्टी शेतकऱ्यांकडून वसूल करत असते. मात्र, या धरणाच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना करण्यात येत नाहीत. संबंधित गोंदिया पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यावर गंभीरपणे विचार करतील का.?

करोडो रुपयांचा काय…
पुजारीटोला -कालिसराड धरण सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक म्हणून एका कंपनीला करोडो रुपयांचे टेंडर देण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.मात्र धरणावर सुरक्षा नावापुरतेच.
शिरपूर धरणाची स्थिती गंभीर…
शिरपूर धरणावर सुद्धा फक्त एक सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात आले असून टेंडर नुसार सुरक्षा रक्षकाला पगार कमी दिला जातो. यावर सुरक्षा रक्षक. बाकीचा पगार कुठे?. असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा रक्षकामुळे पर्यटक वर्गाला सुरक्षा प्रदान होत असते परंतु, संबंधित धरणावर सुरक्षा रक्षकच नाही तर, पर्यटक आपले मनमर्जी पणे, धरणावर कोठेही भटकत असतात. यावर अनुचित घटना घडली तर, याला जबाबदार कोण?. असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होते.

सर्व धरणावर सुरक्षा गार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांशी बोलुन धरण परिसरातील सुरक्षा रक्षकांची माहिती घेतो.राजीव कुरेकार, कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग गोंदिया