किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

0
8

अर्जुनी मोर. :– तालुक्यातील बोंडगाव देवी येथे सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ तथा प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना/ बाकटी व आयुर्वेदिक दवाखाना बोंडगाव देवीच्या संयुक्त विद्यमाने तारीख 27 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बोंडगाव देवी येथील किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
या मार्गदर्शन कार्यक्रमात मासिक पाळीचे महत्त्व ,शारीरिक व मानसिक वयोमानानुसार बदल, रक्त कमतरतेसाठी आवश्यक आहार व भोजन ,परिसर स्वच्छता व शारीरिक स्वच्छता अशा अनेक किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी ( डोंगरवार ),डाॅ. कुंदन कुलसंगे ,डॉ. सुरेंद्र खोब्रागडे, प्राचार्य विलास खंडाईत ,यांनी वर्ग आठ ते बारावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन व समुपदेशन केले. या कार्यक्रमाला डॉ. श्वेता कुलकर्णी ,डॉ. सुरेंद्र खोब्रागडे, डॉ. पूजा गजभिये, डॉ. पल्लवी नाकाडे, डॉ. कुंदन कुलसुंगेे गणेश उत्सव मंडळाचे कैलास घावडे, दिलीप बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पारधी सर, कापगते सर, स्वाती लोहारे, नीलकंठ राऊत ,दिनेश परशुरामकर ,हलमारे सर आदींनी परिश्रम घेतले.