अभिसरण योजनेतून २५ लक्ष रुपयांच्या निधीत महिला बचत गट भवनाचे निर्माण होणार

0
7

गोंदिया : आमदार विनोद अग्रवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोंदिया विधानसभा मतदारसंघातील कारंजा गावात अभिसरणाच्या माध्यमातून 25 लाख रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. महिला बचत गटाच्या इमारतीच्या बांधकामामुळे गावातील महिलांना बचत गटाच्या बैठका आयोजित करण्याबरोबरच लघुउद्योग करण्याची सुविधा मिळणार आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावात महिला बचत गट भवन स्थापन करण्यात येणार आहे. महिला बचत गटाच्या इमारतीच्या बांधकामामुळे परिसरातील महिलांना व्यापारी केंद्र उपलब्ध होणार आहे.

आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने अभिसरण योजनेतून विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच गावांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून महिला बचत गटाच्या इमारती बांधल्या जात आहेत. यासाठी महिलांनी जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार मानले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारची संकल्पना केवळ गोंदिया विधानसभा मतदारसंघात राबविली जात असून या कार्यक्रमाचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले.

भूमिपूजनाच्या या कार्यक्रमात प्रामुख्याने रोहित अग्रवाल, नोकचंद कापसे ग्राम पंचायत सरपंच कारंजा, उपसरपंच विट्ठलराव हरडे, तसेच ग्राम पंचायत चे सर्व सदस्य, चाबी संघठन चे सर्व पदाधिकारी व अन्य गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.