गोंदिया : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनपर आमगाव येथे १ तास साफसफाईसाठी माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष येसूलाल उपराडे यांच्या समवेत भाजपचे प्रमुख कार्यकर्ते तसेच पदाधिका-यांच्यासह श्रमदान केले. स्वच्छतेचा उपक्रम निरोगी जीवनासाठी सतत सुरु ठेवणे गरजेचे आहे प्रत्येकांनी स्वच्छता ठेवणे आपली जबावदारी असे ठरवले तर परिसराला स्वच्छ राहील आणि आरोग्य निरोगी. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छतेसाठी एक तास उपक्रम राबवला असून आपण सर्वांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे असे मत विजय शिवणकर यांनी मांडले. या प्रसंगी सर्वांनी मोठ्याप्रमाणात या उपक्रमात सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला या करीता माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवनकर यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच या दरम्यान श्रमदानानंतर कार्यकर्त्यांसोबत जलपान ग्रहण करण्यात आले.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवनकर, भाजप गोंदिया जिल्हाध्यक्ष येसुलालजी उपराडे आणि प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या सख्येने उपस्थित होते.