गोंदिया-राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान आयुष्मान भवः अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ पथका मार्फत अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील वयोगट 0 ते 18 वर्ष मुलांची तपासणी करण्यात येत आहे. त्यापैकी आजारी आढळुन आलेल्या बालंकावर औषधोपचार करण्यात आले असुन आवश्यक असलेल्या बालकांना सोनोग्राफी, एक्स-रे, ई.सी.जी. साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित केले जात आहे. काही ह्रुदया संबधित संशयित आजार असलेल्या बालकांची अत्याधुनिक 2-डी ईको तपासणी शिबीर दि. 30/09/2023 व 01/10/2023 ला कुंवर तिलक सिंह जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पार पडले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेड़े, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ भारती जैसवाल,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिनेश सुतार, साथरोग अधिकारी डॉ निरंजन अग्रवाल,जिल्हा मौखिक अधिकारी डॉ. अनिल आटे व संपूर्ण वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम गोंदिया जिल्हा उपस्थित होते.
दि. 30/09/2023 व 01/10/2023 ला दोन दिवसीय 2 –डी इको शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया व आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत सन्दर्भित 0 ते 18 वयोगटातील संशयीत हृदय रुग्णांपैकी 125 बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणी वर्धा येथून आलेले बाल हृदय शल्य चिकित्सक डॉ शंतनू गोमासे व समन्वयक श्री प्रतीक गडकरी यांनी केली. .पात्र लाभार्थीची मोफत हृदय शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे.
सदर शिबिरासाठी श्री संजय बिसेन जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक ,सांख्यिकी अन्वेक्षक अनिरुद्ध शर्मा डि.ई.आय.सी व्यवस्थापक पारस लोणारे ,विविध कार्यक्रमातिल समन्वयक व जिल्ह्यातील संपूर्ण वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यानी विशेष परिश्रम घेतले
आजाराच्या निदानामुळे उपचाराला दिशा –
अभियानांतर्गत बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तशय, डोळ्यांचे आजार ,गलगंड, स्वच्छ मूख अभियान, दंतविकार, हृदयविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा,सिकलसेल, एपिलेप्सी व अन्य आजाराची संदीग्ध रुग्णांवर त्वरित औषध उपचार करणार येत आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार सोनोग्राफी, एक्स-रे, ई.सी.जी. केले जात आहे.
आयुष्मान भवःअभियान अंतर्गत आरोग्य पथकाच्या माध्यमातून शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांचे आरोग्य तपासणी करण्यात येत असुन बालकांना आजार आढळल्यास त्यावर आरोग्य विभागामार्फत मोफत तपासणी,उपचार आणि गरज भासल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
– अनिल पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया