नागपूर,दि.01ः– कंत्राटी शासन भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठीआज विविध विद्यार्थी आणि युवक संघटनांकडून कंत्राटी भरती विरुद्ध पैदल मार्च व धरणे आंदोलन काढण्यात आले.शासनाचे कंत्राटी पदभारतीचा शासन निर्णय काढल्यावर बेरोजगार युवकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.या आंदोलनात जवळपास 300 विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी खांद्याला काळ्या फिता बांधून संविधान चौकाकडे पायदळ मार्च केले. संविधान चौक येथे धरणे आंदोलन केले व पकोडे आणि चहा विकून कंत्राटी भरतीचा निषेध केला.
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया, युवा ग्राज्युएट फोरम,ओबीसी युवा अधिकार मंच,महाविधी लॉ असोसिएशन, डॉ. बाबसाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन आणि विविध संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.यामध्ये प्रामुख्याने स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश कोर्राम, मंगेश नागदेवे, राहूल हनवते, कृतल आकरे,पियूष आकरे,अतुल खोब्रागडे,प्रा.रमेश पिसे,अनुप खड्डकर, पंकज सावरबांधे, निकेश पिने, देवेंद्र समर्थ,धीरज भिसिकर,मनीष गिरडकर, गौतम कावरे, नयन कालभांडे, अनुप खड्डकर, सोनू फटींग, निता मडावी, प्रफुल ढेंगरे, रोहित उंदीरवाडे,निखिल रामटेके,मनोज गजभिये,प्रवीण भरणे, अमित सवाई,चिंटू बेलेकर,चाहत सरदारे,रंजना सूर्जुसे, आकाश वैद्य,मनीष गिरडकर, लखन इंगळे,प्रकाश वाघमारे,रजत मालसा आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.