महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त सैन्य दलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार

0
10

गोरेगाव-०२/१०-तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे २ ऑक्टोबर ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसानचा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त मोहाडी गावातील पाच होतकरू तरुण भारतीय सैन्य दलात निवड झालेले प्रतिक चंन्द्रशेखर बघेले , प्रविन मुकेश येरखडे , हर्षल पन्नालाल भोयर , धर्मेश शामलाल पटले , प्रिया मुनेश बिसेन व मोहाडी येथील पोलिस पाटील पदी निवड झालेला राजेश रूपचंद येळे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे , प्रमुख अतिथी तंन्टामुक्त गाव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले ,माजी सरपंच धुर्वराज पटले , माजी उपसरपंच श्रीराम पारधी , ग्राम पंचायत सदस्य भिवराज शेंडे , योगराज भोयर , खेमराज वाकले ,पुस्तकला पटले, चंन्द्रकांता पटले,नेहा उके, पुजा डोहाळे,सेवा सहकारी संस्था सदस्य योगेश्वर पटले,लक्षीराम भोयर, ओमकार येळे,सेवानिवृत्त पोस्टमास्तर हिरालाल महाजन, शिवराम मोहनकार, तेजलाल कावडे,भुराजी भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच चौरागडे यांनी येथील पाच युवक युवतींची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने मोहाडी गावांचे नाव गौरवान्वित केले आहे.तसेच गावातील पुढे जाणार्या विद्यार्थ्यांना सुध्दा प्रोत्साहन मिळावे असे विचार व्यक्त करीत निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.संचालन व आभार ग्रांम पंचायत मोहाडीचे ग्रामसेवक पी.बी.टेंभरे यांनी केले.