युवा पिढीने ग्रंथाचे वाचन करून स्पर्धात्मक परीक्षेत यश प्राप्त करावे -आमदार मनोहरराव चंन्द्रिकापुरे

0
15

आदर्श सार्वजनिक वाचनालय चे ४२ वा वर्धापन दिन उत्साहात
गोरेगाव,दि.03ः- वाचन म्हणजे जीवनातील प्रगतीचा मार्ग वाचनामुळे बुद्धिमत्ता अधिक वाढते तसेच मानसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो. कौंटुबिक, आर्थिक सामाजिक भावनिक आणि माणसिक दुर्ष्टया व्यक्तीला परिपक्व होण्यास वाचन मदत करते. प्रत्येक ग्रंथ शिकण्यासाठी एक नवीन संधी देत असते. ग्रंथामुळे ज्ञानात भर पडते युवा पिढीने जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात येऊण ग्रंथाचे वाचन करून स्पर्धात्मक परीक्षाचे अभ्यास करून  यश प्राप्त करावे असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी केले. ते मोहाडी येथील आदर्श सार्वजनिक  वाचनालयाच्या ४२ वा वर्धापन दिन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्राचे जि.प.सदस्य डॉ लक्ष्मन भगत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयचे ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे, पंचायत समिती सदस्य रामेश्वर माहारवाडे, मोहाडी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, सामाजिक कार्यकर्ता बाबा बहेकर, संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, संस्थेचे सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे, उपाध्यक्ष जे.जे.पटले, सदस्य हिरालाल महाजन, देवदास चेचाने, सुभाष चौरागडे,वाय.एफ.पटले,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी आमदार मनोहररावजी चंन्द्रिकापुरे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ग्रंथालयाला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन लक्ष ९२००० हजार रूपयेचे ग्रंथ भेट दिल्याबद्दल आमदार यांचें संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलेे.
ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीने ग्रंथाचे वाचन करावे व आपल्या पाल्यांना सुध्दा जास्तीत जास्त ग्रंथ वाचनाची सवय लागावी यासाठी प्रयत्न करावे ग्रंथालयाची प्रगती बघून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे मागील ४२ वर्षाचे प्रगती अहवाल सादर केले व ग्रंथालयाला कपाट,अलमारी व इमारत साठी आर्थिक मदत करण्याचें आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एफ.पारधी यांनी तर आभार जे.जे.पटले यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक व वाचक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.