स्वच्छता ही सेवा व मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमाअंतर्गत पशीने विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

0
10

गोंदिया,दि.03- शालेय शिक्षण विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केल्यानुसार दि. 01. ते दि.02.10.2023 पर्यंत स्वच्छता ही सेवा अंतर्गत गृह भेटी द्वारे स्वच्छतेचे महत्त्व ,शालेय परीसर व बसस्थानक स्वच्छता ,स्वच्छता प्रश्न मंजुषा स्पर्धा,घोषवाक्य व पोस्टर स्पर्धा,कविता लेखन व रांगोळी स्पर्धा व स्वच्छता मॉनिटर यांचे व्हिडीओ,स्वच्छतेची शपथ इत्यादी उपक्रम पशीने विद्यालय दासगाव येथे आयोजित करण्यात आले.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून गावात कलश यात्रा काढून माती गोळा करण्यात आली. तसेच “एक तारीख एक तास श्रमदान” उपक्रमा अंतर्गत श्रीमती अनुसयाबाई पशीने विद्यालय व सौ.अर्चना पशीने कला व विज्ञान ज्युनिअर कॉलेज दासगाव येथे शालेय परिसर ,सामूहिक स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या कु.व्ही.पी.बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वच्छता समिती प्रमुख प्रा.टी.के.बावनकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्राध्यापक,शिक्षक,विद्यार्थी यांनी शालेय परीसर,व ग्राम सचिवालय येथे श्रमदान केले .यावेळी दासगावच्या सरपंच माननीय राणुताई तुरकर , ग्रामसेवक रहांगडाले, ग्राम दासगाव बुज. चे सर्व ग्राम पंचायत सदस्य व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.