गोरेगाव : तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत मंजूर पोंगेझरा पुरगाव(हिरडामाली) येथे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते ४५ लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. महाशिवरात्री ला पोंगेझरा येथे मोठी यात्रा भरते त्या अनुषंगाने रस्ता दळणवळणासाठी सोयीस्कर व रस्त्यात होणारी वाहतुक सुरळीतपणे प्रवास करण्यासाठी ठरेल असा विश्वास यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केला. यावेळी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, हेमंतजी पटले माजी आमदार, मनोज बोपचे प.स. सभापती, चित्रलेखाताई चौधरी प.स.सदस्य, गणवीर ताई प. स. सदस्य, प्रेमभाऊ रहांगडाले, राजकुमारजी भेलावे, तरोणे ताई, नाईक ताई, अनंताभाऊ ठाकरे आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते.
युवा नेतृत्व म्हणून लाभेलेले जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या मागील १ वर्षाचा कार्यकाळ जनतेसाठी फायद्याचा ठरला आहे. विविध विभागांमार्फत कोट्यवधीचा त्यांनी मंजूर करवून आणला असून गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात विकास कामे होतांना दिसत आहे.