देवरी,दि.०५- देवरीच्या हेल्पिंग गृपच्या वतीने गोंडवाना साम्राज्याची विरांगणा महाराणी दुर्गावती यांची ४६९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
देवरीच्या चिचगड चौकातील महाराणी दुर्गावतींच्या पुतळ्याला याप्रसंगी माल्यापर्ण करून आदरांजरी वाहण्यात आली. यावेळी हेल्पिंग गृपचे सदस्य सोमण चव्हाण, एलियैाज कुरैशी, सचिन भांडारकर, राज भाटीया, सुजीत अग्रवाल, सुरेश तांडेकर, पवन शर्मा, हेमंत ताराम, परवेज शेख, जागेश सिंंदीमेश्राम, बबलू जामकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.