अबब;महाकाय अजगर! तीन शेळ्या गिळल्या

0
6

आमगाव -तहसील मुख्यालयापासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर असलेल्या सिवनी आणि जवरी गावात ॲनाकोंडा सदृश महाकाय अजगर गेल्या २-३ महिन्यांपासून गावातील सायफन नाल्याजवळ तळ ठोकून आहेत. अनेकांनी हे स्पष्टपणे पाहिले आहे आणि आतापर्यंत त्यांनी तीन शेळ्याना आपले शिकार बनवले आहे. यामध्ये जवरी येथील रहिवासी इमलाबाई येटरे, धनलाल येटरे आणि कुंताबाई भांडारकर यांच्या मालकीच्या शेळ्यांचा समावेश आहे. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागालाही दिली आहे. मात्र आजपर्यंत विभागाचे कोणीच फिरकले नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.

समन्वयादरम्यान गावातील एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, हा अजगर एवढा मोठा आहे की तो एखाद्या नागरिकालाही आपला बळी बनवू शकतो, त्यामुळे या अजगरांची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. जेणेकरून अशा घटना टाळता येतील. या संदर्भात आमगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत यांच्याशी चर्चा केली असता, वनविभागालाही माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.