
= गुढरी येथे राणी दुर्गावती जयंती साजरी
अर्जुनी मोर. :- आदिवासी समाजाच्या प्रेरणास्थान राणी दुर्गावती यांचा 500 वर्षापूर्वीचा इतिहास हा त्याग बलिदान व शौर्याचा आहे. राजघराण्यात जन्मलेल्या राणी दुर्गावती ह्या सर्वच कलेत पारंगत होत्या. राजवाड्यातूनच शौर्याचे धडे मिळाल्याने त्यांनी मुघल सम्राटांना सळो की पळो करून ठेवले होते. आपल्या राज्यातील जनतेला समता न्याय व बंधुत्व मिळवून देऊन प्रजेचे हित जोपासणाऱ्या कार्यक्षम शासनकर्ती म्हणून त्या इतिहासात प्रसिद्ध ठरल्या आहेत. 5 ऑक्टोंबर 1524 ला जन्मलेल्या राणी दुर्गावती ह्या केवळ चाळीस वर्षे आयुष्य जगल्या. मात्र त्यांच्या पराक्रमामुळे त्या अजरामर झाल्या. अशा महान शुरसंग्रामी राणी दुर्गावती च्या कार्याची प्रेरणा घेऊन आदिवासी व इतर समाज बांधवांनी सत्य व न्यायासाठी व समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने लढावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांनी केले.
अर्जुनी मोर तालुक्यातील गुढरी येथे राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या विशेष अतिथी म्हणून बोलत होत्या. समारोहाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष वसंतराव सोरते होते. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य पुष्पलता दृगकर ,सरपंच विवेक डोंगरे, सर्व ग्राम पंचायत सदस्य, चतुर्भुज दिरबुडे; सुभाष बनसोड, गोविंदराव भांडारकर, मोहनदास खोब्रागडे, माजी सरपंच लिलेश्वर खुणे, माजी सरपंच शालू फुंडे, केशव भांडारकर, देवराव भांडारकर, मार्कंड भांडारकर, चोपराम मडावी, भोजराज बहेकार, दुर्गाबाई कापगते, शिवकुमार रामटेके, प्रकाश बोरकर, बबन दोनोडे, सुवर्णा सरोते, किरण रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम राणी दुर्गावती यांचे पूर्णाकृती पुतळ्याला मल्यार्पण व दीप प्रजल्वित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव सोरते यांनी राणी दुर्गावतीच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून आदिवासी समाज बांधवांनी त्यांचे विचाराची प्रेरणा घेऊन बलाढ्य समाज निर्माण करावे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला शिका संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचा अंगीकार करण्याचे आव्हान केले. इतर मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव व ग्रामवासी उपस्थित होते.