= जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यामार्फत मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर
अर्जुनी मोर. (सुरेंद्रकुमार ठवरे )- महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदिया मार्फत दिल्या जाणाऱ्या शिलाई मशीन , सायकल व इतर योजनांकरिता त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे बहुजन समाज कल्याण मंत्री अतुल सावे यांना देण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील समाज कल्याण व महिला बालकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील महिला व विद्यार्थ्यांना शिलाई मशीन सायकल व इतर साहित्य पुरविले जातात. परंतु इतर प्रवर्गाकरिता उदाहरणात ओबीसी, खुला, एनटी ,एसबीसी या प्रवर्गातील महिला व विद्यार्थ्यांना या विभागाच्या योजनेपासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी जनता आक्रोशीत आहेत.त्यांचा परिणाम जनप्रतिनिधीवर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. गोंदिया जिल्हा परिषदेला ओबीसी, खुला, एनटी ,एसबीसी व इतर सर्व प्रवर्गाकरिता एकूण पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावे.जेणेकरून या सर्व गरजू महिला व विद्यार्थ्यांनी जे अर्ज केलेले आहेत,त्यांनाही लाभ देणे सोयीचे होईल अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे.निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य अंजली अटरे , जयश्री देशमुख ,पोर्णिमा ढेंगे ,हनुमंत वटी, कविता रंगारी, प्रीती कतलाम, पंचायत समिती सदस्य चित्रकला चौधरी; सरपंच प्रतिभा भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य बी एन पटले; किशोर महारवाडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते महिला व पुरुष उपस्थित होते.