रुग्णाच्या उपचाराकरीता आ.विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातुन १ लक्ष रूपये मंजूर

0
14

गोंदिया : जनतेचे आ.विनोद अग्रवाल यांनी आपल्या दारात येणाऱ्या प्रत्येकाची मदत केली आहे. आजवर अनेक डोळ्यांचे, हृदयरोगाचे ऑपेरेशन त्यांनी निशुल्क किंवा कमी पैशात करून दिले आहेत. त्यांच्या दारी कोणीही मदतीसाठी आल्यावर त्यांना सांत्वना म्हणून आर्थिक मदद स्वत किंवा मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत ते नेहमी करत आलेले आहेत. अलीकडेच त्यांनी कुमार अश्विन प्रेमलाल कावडे, यांना मेंदूचा आजार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आ.विनोद अग्रवाल यांच्याकड़े धाव घेतली असता  त्यांच्या मदतीसाठी आ.विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लक्ष रुपये मंजूर करून आणण्यास यश मिळवले आहे. या करीता रूग्णाच्या परिजनानी आ.विनोद अग्रवाल यांचे आभार मानले आहे.