शहीद वीर सिताराम कंवर यांचे कार्य प्रेरणादायी:-इंजि.यशवंत गणविर

0
17

अर्जुनी मोरगाव,दि.०९- तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रात, घनदाट जंगलात वसलेल्या येरंडी/दर्रे येथे शहीद वीर सिताराम कंवर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे सह उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना, शहीद वीर सिताराम कंवर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात मध्यप्रदेश राज्यात इंग्रजी राजवटीला सडो की पडो करुन सोडले.परंतु शोकांतिका आहे की इतिहासाच्या पानांवर कुठेही आपल्या क्रांतिकारकांचे नाव नाही जणु काही इतिहासातुन आदिवासी क्रांतिकारक अलिप्त झाले.परंतु आपला समाज शिक्षित होउन आज आपला इतिहास जाणून घेत आहे आणि आपला इतिहास जगासमोर आणत आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की,”जो अपना इतिहास नहीं जाणते वे कभी अपना इतिहास नही बना शकते”,पण माझा आदिवासी बांधव इतिहास जाणुन इतिहास घडविण्याच्या तयारीत आहे.आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढत आहे.आज या जंगल व्याप्त छोट्याशा गावात एवढा मोठा कार्यक्रम उभारुन सामाजिक क्रांतीचा एक अनोखा दाखला दिला आहे. आणि मला अभिमान वाटतो की मी या क्षेत्राचा प्रतिनिधित्व करतो.अशीच कामगिरी आपण भविष्यात करत सामाजिक क्रांती घडवून आणावी,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते व बिंदुरामजी फुलकुवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे, डॉ.मेघराज कपुर,महारुजी फुलकुवर,शामलाल घाटघुमर,रामछत्री चंद्रवंशी, अंबिका बंजार सभापती देवरी, दुर्गा प्रसाद कोकोडे,विलास भोगारे, सरपंच करणदास रक्षा,पतिराम भोगारे अध्यक्ष आ.वि.संस्था पवनी,रामु फरदे, संचित वाढवे,उमेश बागडेरीया,कमल मिरी,नारायण मिरी,जितु मिरी तथा क्षेत्रातील आदिवासी कंवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.