मेंदीपूर येथे घराला आग लागून लाखों चा नुकसान

0
12

…… *जीवितहानी नाही* ……..
*तिरोडा* :- तालुक्यातील ग्राम मेंदीपूर येथे घराला आग लागून लाखों चे नुकसान झाले आहे. जीवितहानी झाली नाही. गावातील तरुणांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी जीवाची बाजी लावली.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक ०९/१०/२०२३ रोजी रात्री अंदाजे ०८:३० सुमारास तिरोडा तालुक्यातील ग्राम मेंदीपूर येथे गावकरी लालचंद चचाने हे गाव मंदिरात आरती साठी सहपरिवार गेले असता, त्यांचे घरातून धूर निघू लागल्याने शेजारी यांनी कळविले. घराजवळ येताच आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन यांना तात्काळ फोन करण्यात आले. तेव्हा गावातील तरुण यांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी जीवाची बाजी लावून घरगुती मोटार पंप च्या साह्यानेआग विझविली. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या गावात दाखल झाल्या उर्वरित आग विझविली..
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर गावातील तरुण मदतीला आले नसते तर कदाचित लागून असलेली पाच ते सहा घरे देखील आगीत स्वा झाली असती. गावकरी लालचंद चचाने यांचे विटा कवेलू चे घर जळून खाक झाले असून घरातील संपूर्ण सामान जळाला आहे. घरात ठेवलेले पैसे, तांदूळ अन्य धान्य, कपडे व सोफा व अन्य पूर्णच सामान जळून खाक झाला आहे. गावातील तरुणांनी गॅस सिलेंडर प्रसंगावधान राखून आगीतून बाहेर काढले त्यामुळे फारच बरे झाले.
घटनास्थळी गावाचे सरपंच, पोलीस पाटील व ग्राम पंचायत सदस्य, तमुंगा सदस्य यांनी धाव घेतली. तसेच तलाठी यांनी मौक्यावर तात्काळ जाऊन पंचनामा केला. श्री लालचंद चचाने यांच्या व त्यांच्या घरातील सदस्य यांचे अंगावरील कपडे फक्त वाचले आहेत. तरी शासनाने तात्काळ मदत व अर्थ सहाय्य पुरविण्याची गावकरी यांनी मागणी केली आहे. सदरहू आग ही शार्ट्सर्किट ने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.