अर्जुनी मोर.:- ( सुरेंद्रकुमार ठवरे ) गावागावात सार्वजनिक समाज भवन तसेच सांस्कृतिक भवन तयार होत आहेत.या भवनात संपुर्ण गाव एकत्रितपणे येवुन विविध कार्यक्रम करावे विचाराची देवानघेवान व्हावी.याच भवनातुन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगले कलावंत निर्माण व्हावे.विचारवंत व भाषणपटु निर्माण व्हावे.याच भवनातुन ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या चर्चा व्हाव्या.या उदात्त हेतुने हे सांस्कृतिक भवन तयार होत आहेत. त्यासाठी हे भवन गाव उन्नतीचे माध्यम बनावे असे आवाहन या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी केले. अर्जुनी मोर. तालुक्यातील मुंगली येथे 15 लक्ष रुपयांचे सांस्कृतिक भवन तयार करण्यात आले. त्याचे लोकार्पण प्रसंगी ता.10 उद्घाटिका म्हणुन रचनाताई गहाणे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच कुशन नेवारे होते.तर अतिथी म्हणुन पंचायत समिती सदस्या पुष्षलताबाई द्रुगकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर मरसकोल्हे,उपसरपंच गुणवंताबाई वालदे,ग्रामपंचायत सदस्य राजेश कापगते,उत्तम नेवारे,शालिनी काटेंगे,पुस्तकला मेश्राम,ओमप्रकाश सांगोळकर,सरिता मेश्राम,तंटा मुक्त गाव समिती अध्यक्ष प्रवीण वालदे,विविध पदाधिकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. नंतर सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांचे हस्ते करण्यात आले.
सांस्कृतिक भवन हे गाव उन्नतीचे केंद्र बनावे :- रचनाताई गहाणे
वाढदिवसाच्या शुभेच्छा