आवास योजनेचे थकीत हफ्त्याची मागणीसाठी न. प. समोर भाकपा आंदोलन करणार

0
11

गोंदिया,-गोंदिया नगर परिषद अंतरगत विविध आवास योजनेचे बाकी हफ्ते त्वरित मिडण्याच्याचे मागणीला घेवून भारतीय कॅम्युनिस्ट पार्टी शहर शाखेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी श्री राणे यांना निवेदन सादर करण्यात आले . निवेदनात मागणी करण्यात आली कि प्रधान मंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, सबरी आवास योजना अंतर्गत ज्या गरजू लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम सुरु केले त्यात कोणाला पहिला हफ्ता व कोणाला दुसरा, तिसरा हफ्ता अदा करण्यात आला व मागील एक वर्षा पासून उर्वरित हफ्तेच दिले नाही लोकांनी कर्ज करून बांधकाम केले व कर्ज बाजारी झाले पण संबंधित विभाग या कडे दुर्लक्ष करत आहे अशा लोकांची यादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने सादर करून येत्या पंधरा दिवसाचे आत या सर्वाना उर्वरित हफ्ते प्राप्त न झाल्यास गोंदिया नगर परिषदे समोर बेमुदत धरणे आंदोलनाची सूचना पक्षने दिली आहे निवेदन देतांना मिलिंद गणवीर(जिल्हा सचिव ),रामचंद्र पाटील(जिल्हा सहसचिव ), करुणा गणवीर(राज्य कौंन्सिल सदस्य ), सुरेश रंगारी,(शहर संयोजक )सुनंदा चन्ने, निर्मला मेश्राम,लता देशमुख सह इतर कार्यकर्ते हजर होते.